मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर येथे रविवारी जवानाने स्वतःवर सहा गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. पवन असे जवानांचे नाव असून त्यांनी एके 47 रायफलींमधून स्वतःवर सहा गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डीएसपी अमितेश कुमार यांचे अंगरक्षक म्हणून पवन यांना तैनात करण्यात आले होते.
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून पवन यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पवन यांचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.