छोट्या पडद्यावरील “इंडियन आयडॉल-12’च्या सीजनमधील विजेता आता निश्चित करण्यात येणार आहे. याप्रसंगी सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये सेलिब्रिटी गेस्ट्स म्हणून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी उपस्थित राहणार आहेत.
तब्बल 12 तास रंगणाऱ्या या भव्य एपिसोडमध्ये ग्लॅमरसह बॉलीवूडचाही तडका लावण्यात येणार आहे. याप्रसंगी सिद्धार्थ आणि कियारा हे टॉप-6 फायनलिस्ट्स – पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, मोहंमद दानिश, सायली कांबळे, निहाल तौरो आणि शण्मुख प्रिया यांना सपोर्ट करताना पाहावयास मिळणार आहे.
या एपिसोडमध्ये सर्व कंटेस्टेंट्स सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या हॉट जोडीसाठी खास परफॉर्म करणार आहेत. यावेळी हे दोन्ही कलाकार आपल्या आगामी “शेरशाह’ प्रमोट करणार आहेत.
सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला की, “इंडियन आयडॉल-12’चा सीजन 12 तास रंगणार असून, यात मोठी धम्माल पाहावयास मिळेल. या एपिसोडसाठी मीदेखील उत्साहित आहे.
दरम्यान, होस्ट आदित्य नारायण आणि जज अनू मलिक, हिमेश रेशमिया आणि सोनू कक्कडही सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी सोबत उपस्थित राहणार आहे. दुसरीकडे कियारा आडवाणीनेही सर्व कंटेस्टेंट्सला शुभेच्छा दिल्या आहेत.