मुंबई – अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली आहे. मात्र आता श्वेतासह तिची लेक पलक तिवारी देखील सध्या चर्चेत असते. पलकने अलीकडेच सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिला खूप पसंत केले जात आहे. श्वेताचे दोनदा लग्न झाले होते आणि तिला पहिल्या लग्नापासून पलक आणि दुसऱ्या लग्नानंतर एक मुलगा झाला. पलकने नुकतेच एका मुलाखतीत केलेल्या तिच्या वक्तव्यामुळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एका मुलाखतीत पलकने तिची आई श्वेता तिवारी बद्दल मोठे केले आहे. ती म्हणाली की,” पलकच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये श्वेता तिच्याशी खूप कठोर वागत होती. त्या दिवसांमध्ये श्वेताचा लेकीवर अजिबात विश्वास नव्हता. पण पलकने तिच्या वागण्याने आईचा विश्वास संपादन केला होता.” त्यामुळे श्वेताचा पलकवर विश्वास बसू लागला. मात्र त्या श्वेता पलकला एक सक्त ताकीद दिली होती. ज्याचा खुलासा तिने यावेळी केला आहे.
“जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा तिने मला एक सक्त ताकीद दिली होती. तिने मला सांगितले होते की, माझं नाक कापू नकोस, माझी इमेज खराब करू नकोस. मी काहीही केलं की ती मला, हे काय करते आहेस? असं नेहमी विचारते,” असे पलकने सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पलकने मालदीवमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळीयावेळी तिच्यासोबत फ्लोटिंग ब्रेकफास्टही ठेवण्यात आला आहे. पलकचा हा रॉयल लूक पाहण्यासारखा आहे. ती तिच्या शाही थाटामध्ये स्विमिंग पूलमध्ये उतरून आपल्या ब्रेकफास्टचा आनंद घेताना दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्याही पसंतीस पडला होता.