मुंबई – बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या अफेअरमुळे चर्चेत असतात. विशेष म्हणजे अफेअरनंतर वेगळं झाल्यानंतर देखील त्यांच्याबाबत फॅन्समध्ये उत्सुकता असल्याचे दिसून येते. यातीलच एक नाव म्हणजे रणबीर कपूर आणि दीपक पदुकोण. हे दोन्हही स्टार सध्या आपल्या आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये खुश आहेत. मात्र ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच रणबीर दीपिका सोबत आल्याच पाहायला मिळालं.
बॉलिवूडमधील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक, ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. हा खास क्षण साजरा करण्यासाठी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट एकत्र आली होती.यावेळी बनी आणि नैना अर्थात रणबीर दीपिका देखील एक मेकांसोबत पार्टी करताना दिसले. यावेळेसचे काही फोटो देखील दीपिकाने शेअर केले आहेत.
दोन्ही फोटोंमध्ये दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर खूप जवळ आहेत. अशा परिस्थितीत लोक दोघांचे कौतुक करत आहेत. दुसरीकडे, दीपिका पदुकोणने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर सदस्य दिसत आहेत. दीपिकाचे हे फोटो पाहून लोक या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलत आहेत.
View this post on Instagram
ये जवानी है दिवाणी हा रणबीर दीपिकाचा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामुळे हि जोडी देखील प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. याच काळात दोघांमध्ये डेटिंग सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. तसेच यापूर्वी देखील या दोघांनी सोबत काम केलं होत. आपल्या कौटुंबिक आयुष्यातून वेळ काढत दोघेही एकत्र आल्याने फॅन्स देखील चांगलेच खुश झाले आहेत.