बॉलीवूडमध्ये पालकांसोबतच त्यांच्या मुलांचेही एकमेकांशी मैत्रीपूर्ण नाते असते. स्टार किड्स वारंवार एकमेकांसोबत स्पॉट होणे ही नवीन गोष्ट नाही. आता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक यांना एकत्र स्पॉट केल्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.दोन्ही स्टार किड्स एका रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून युजर्स वेगवेगळे अंदाज लावत आहेत.
या व्हिडीओमध्ये सैफचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत पलक तिवारी एकाच गाडीमध्ये बसलेली पहायला मिळत आहे. मात्र पापाराझींनी या दोघांना बघितल्यानंतर तिने चेहरा लपवला आहे. पलक ज्या पद्धतीने चेहरा लपवत असल्याचं पाहून नेमकं या दोघांमध्ये काय शिजतंय, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होऊ लागली आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतल्या एका कॅफेमध्ये हे दोघं गेले होते. तिथून बाहेर पडताना दोघांनी फोटोग्राफर्स आणि पापाराझींना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले.
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, सुरुवातीला पलक तिवारी रेस्टॉरंटमधून बाहेर पडते आणि काही वेळातच सैफचा मुलगा इब्राहिम बाहेर येतो. यानंतर दोन्ही स्टार किड्स कारमध्ये एकत्र बसतात आणि तिथून निघून जातात. यावेळी पलक आणि इब्राहिम दोघेही कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटताना दिसले. कारमध्ये बसल्यानंतरही पलकने आपला चेहरा हाताने लपवला तर इब्राहिम अली खान हसताना दिसला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यूजर्समध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.