शॉर्ट फिल्म कॉर्नर : डिअर एज्युकेशन सिस्टीम, यु हॅव नो सेन्स

या लघुपटात चैतन्य नावाचा मुलगा आपली लाईफस्टोरी सांगत असतो. डिअर एज्युकेशन सिस्टीम पापा, मम्मी आणि सोसायटी, आज माझा रिझल्ट लागला आणि मी पुन्हा एकदा नापास झालो. म्हणूनच खूप मोठे पाऊल उचलत आहे. परंतु, त्याआधी तुम्हाला माझ्याबद्दल काही गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे.

10वी पर्यंत मी अभ्यासात खुप हुशार होतो. चांगले गुण मिळाले म्हणून आई-वडिलांसोबतच मित्र, शेजारी, नातेवाईक एवढेच नव्हे तर माझ्या बिल्डिंगचा वॉचमॅनही म्हणाला, साहेब तुम्ही तर विज्ञान क्षेत्रच निवडणार आणि इंजिनिअरच बनणार. विज्ञान क्षेत्र मला आवडत नाही, अशी गोष्ट नाही. मला विज्ञान आवडते. विज्ञान हे सत्य आहे. परंतु, मी जेव्हा अकरावीत आलो. महाविद्यालयात आणि कोचिंग क्‍लासेसमध्ये आमचे शिक्षक विज्ञान शिकवतच नव्हते. रोबोटसारखे आम्हाला शिकवले जात होते. कमीत-कमी वेळात एमसीक्‍यू सोडवायचे. यामुळे विज्ञानाची सुंदरता कमी होत होती. आणि माझ्या क्‍लासमधील फिजिक्‍स टॉपर उत्क्रांती खरोखरच घडली असल्याचे तो मान्यच करत नव्हता. त्याला केवळ लवकरात-लवकर एमसीक्‍यू सोडवायचे होते.

स्वातंत्र्यानंतर भारताला एकही नोबेल पुरस्कार मिळाला नाही. भारतात वर्षाला मोठ्या संख्येने इंजिनिअर बनतात. तरीही ग्लोबल इनोव्हेशनच्या यादीत भारताचा 16वा नंबर लागतो. म्हणजेच स्वातंत्र्यानंतर कोणताही मोठा शोध लावण्यात आलेला नाही. केवळ आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला यालाच कुरवाळत राहतो.

खरे सांगायचे तर 10वीनंतर मला फिजिक्‍स, ग्राफिक डिझाईनिंग, कोडिंग, इतिहास, संगीत आणि इंग्रजी साहित्यात करिअर करायचे होते. माझ्या बुद्धिमत्तेचे आणि क्षमतेचे मूल्यांकन या विषयावरून का होऊ शकत नाही. मला शिकायचे नव्हते अशा विषयामध्ये मी वेळ घालवत होतो. यामुळे मी आता कोचिंग क्‍लासमध्ये जाणे सोडून दिले. कोचिंगच्या वेळेत घरातून निघून बागेत कादंबरी वाचायचो. नवीन-नवीन जागा फिरायचो. या सर्व गोष्टींमुळे मला स्वतंत्र असल्याचा अनुभव येत होता. मी ग्राफिक्‍स डिझायनिंग शिकलो. मी सुंदर संगीत ऐकायचो. मी एक मोठे पाऊल उचलत आहे. मी इंजिनिअरींग सोडत आहे. यासाठी नाही की स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्‌स यांनी सोडली होती. आणि नापास झाल्याची निराशा तर बिलकुल पण नाही.

डिअर एज्युकेशन सिस्टीम, मी इंजिनिअरींग सोडत आहे कारण यु हॅव नो सेन्स. आता तुम्ही हेच विचारणार की तुला नोकरी कोण देणार? तर कुठे न कुठे कोणीतरी असेलच जो माझे कौशल्य, नाविन्यता पाहतील. केवळ माझ्या सीजीपीएला नाही. मी नापास झालो पण माझ्याकडे भरपूर शिकण्यासारखे आहे. पण मला विश्‍वास आहे काहीतरी चांगलं करेलच.

भारतीय शिक्षण प्रणाली दरवर्षी 1.5 दशलक्ष अभियंता तयार करते, 10 पैकी 9 अभियंते केवळ बेरोजगार आहेत. 10वी बोर्डानंतर विज्ञान निवडत नसल्यास आपणास कनिष्ठ मानले जाते, असा काहींचा गैरसमज आहे. या अक्षम प्रणालीमध्ये अपयशी ठरल्यामुळे जगभरातील आत्महत्यांची संख्या सर्वाधिक आहे. सिस्टीममध्ये काहीतरी चुकीचे आहे का? आपल्याला त्याची वैधता का तपासली पाहिजे? प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या विषयात आवड आहे हे जाणणे गरजेचे आहे. केवळ चित्रपट आणि वृत्त ऐकूण सोडून देणे एवढीच कामे आपण करतो. हे थांबायला हवे. बदलायला हवे.

– श्‍वेता शिगवण

Leave A Reply

Your email address will not be published.