नेवासा, {हेरंब कुलकर्णी} – सद्य स्थितीतील शिक्षण व्यवस्थेला दिशा देण्याचे सामर्थ्य साने गुरुजींच्या कृतीत होते. गुरुजींचे विचार आणि प्रेरणाच आजच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देऊ शकतात .कारण प्रत्येक विद्यार्थी परिपूर्ण घडावा, हे साने गुरुजींचे स्वप्न होते, असे गौरवोद्गार शिक्षण तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी काढले.
साने गुरुजी यांच्या शिक्षकी पेशास सुरुवात केल्याचे हे १०० वे वर्ष असून त्यांचे १२५ वे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त कुलकर्णी यांनी १२५ व्याख्यानातुन राज्यभर ” शिक्षाकांसाठी साने गुरुजी ” सांगण्याचा संकल्प केला आहे. त्यानिमित्त नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. व्यासपीटावर गट शिक्षणाधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर , त्रिमूर्तीचे प्राचार्य डॉ.सोपान काळे, सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड, विषयतज्ज्ञ सामी शेख आदी उपस्थित होते.