नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना आदेश जारी करून त्यांच्या दुकाने आणि प्रतिष्ठाने कायद्या अंतर्गत नोंदणीकृत सर्व दुकाने खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. निवासी संकुलातली दुकाने, नजीकची आणि एकल दुकाने यांचा यात समावेश आहे. लॉक डाऊनच्या नियमातली ही शिथिलता हॉट स्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू नाही याची दखल घेणे महत्त्वाचे आहे.
ही परवानगी महानगर पालिका आणि नगर पालिका हद्द सोडून, बाजारपेठ संकुलातली दुकाने खुली ठेवण्यासाठी आहे. एकलमॉल आणि बहुविध ब्रान्ड मॉल मधली दुकाने कोठेही उघडण्याची परवानगी नाही. परवानगी देण्यात आलेल्या सर्व दुकानांनी केवळ 50 टक्के कर्मचाऱ्यांसह दुकाने खुली ठेवायची आहेत तसेच मास्क वापरणे अनिवार्य असून सोशल डिस्टंन्सिगचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.