जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांनी लखनौमध्ये “सत्यमेव जयते-2′ च्या शुटिंगला सुरूवात केली आहे. पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत या सिनेमाचे शुटिंग चालणार आहे. जॉन आणि दिव्या या दोघांवरच पहिल्या काही दिवसांचे शुटिंग आधारलेले असेल. लवकरच हर्ष छाया, गौतमी कपूर, शाद रंधवा, अनुप सोनी आणि साहिल वैद ही इतर कलाकार मंडळीही या शुटिंगमध्ये सहभागी होणार आहेत, असे दिग्दर्शक मिलाप झवेरीने सांगितले.
लखनौ आणि आजूबाजूच्या पुरातन वास्तूंमध्ये “सत्यमेव्- 2′ चे शुटिंग होणार आहे. यामध्ये जूने राजवाडे आणि जून्या महाविद्यालयांचेही लोकेशन निवडलेले आहे. या सिनेमाचे सर्व शुटिंग मुंबईमध्ये करायचे ठरले होते. पण करोनाच्या साथीमुळे या शुटिंगची सर्व लोकेशन रद्द केली गेली आणि शुटिंग लखनौमध्ये करायचे ठरले. “सत्यमेव जयते’ चा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता.
त्याला प्रेक्षकंनी जो प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद या सिक्वेललाही मिळेल, अशी अपेक्षा निर्माता किशन कुमारने व्यक्त केली आहे. याही सिनेमाची सगळी भिस्त जॉन अब्राहमवरच असणार आहे. “सत्यमेव जयते-2′ च्या पोस्टरमध्ये जॉनचा जो लुक दिसतो आहे, त्यावरून हा एक ऍक्शनपॅक्ड मुव्ही असणार आहे, हे स्पष्ट दिसते आहे.