नवी दिल्ली- भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर नवीन चित्रपट येणार असून निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘मैं अटल हूं’ असे या चित्रपटाचे नाव आहे. बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी हे मुख्य भूमिकेत असणार आहे. तसेच या बायोपिकसाठी पंकज यांनी त्यांचा पहिला लूक शेअर देखील शेअर केला आहे.
हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आणि राजकीय कारकिर्दीभोवती फिरणार आहे, जे केवळ राजकारणी नव्हते तर कवी, सज्जन आणि राजकारणी देखील होते. सिनेमाचे शूटिंग अनेक ठिकाणी झाले आहे. विशेष म्हणजे सिनेमाचे 45 दिवसांपेक्षा जास्त वेळाचे शेड्यूल असणार आहे.
या सिनेमाविषयी बोलताना अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणाले, ”अटल बिहारी यांच्या सारख्या महान नेत्याची भूमिका साकारण्याची संधी मिळणे, हा एक माझ्यासाठी नक्कीच सन्मानाची गोष्ट आहे. त्यांची बोलीभाषा, त्यांची जीवनशैली आणि भारताबद्दलची त्यांची दृष्टी समजून घेण्यासाठी आम्हाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. आज मैं अटल हूं या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याने मला आनंद होत आहे”. असं ते म्हणाले.
मराठमोळा रवी जाधव करणार दिग्दर्शन…
या चित्रपटाचे रवी जाधव करणार दिग्दर्शन करणार असून त्याने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ”मी पंकज त्रिपाठी यांना अटलजींना जाणून घेण्याच्या आणि समजून घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी होताना पाहिले आहे. मला खात्री आहे की अशा प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा निबंध पंकज पेक्षा कोणीही योग्य नसेल.
अटलजींनी त्यांच्या जीवनातून आणि देशासाठी त्यांची दृष्टी देऊन जी जादू निर्माण केली तीच जादू आमच्या चित्रपटातून निर्माण करण्याची आशा आहे”. असं देखील ते म्हणाले आहेत. दरम्यान, हा चित्रपट डिसेंबर 2023 पर्यंत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.