धक्कादायक! सेल्फी काढायच्या बहाण्याने पत्नीला एक हजार फूट उंचीवर नेले अन्…

अंकारा – हॉलिडे स्पॉटवर जात आपल्या पत्नीला एक हजार फूट उंचावर नेले. तेथे या पतीने पत्नीसोबत सेल्फी घेतला आणि त्यानंतर तिला खाली ढकलून दिले. संबंधित महिला सात महिन्यांची गरोदर होती. या घटनेत अर्थातच तिचा मृत्यू झाला आहे.

यासोबतच या जगात न आलेल्या तिच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे. हे कृत्य करण्याआधी या पतीने आपल्या पत्नीचा खासगी ऍक्‍सिडेंटल इन्शुरन्सही काढला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

हकान आयसल असे त्या पतीचे नाव असून तो आणि त्याची पत्नी सेमरा आयसल तुर्कीच्या मुगला शहरात सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. ते बटरफ्लाय व्हॅलीकडे हजार फूट उंचीवर गेले होते. येथे हकानने आपल्या पत्नीसोबत सेल्फी घेतला. त्यानंतर त्यानिर्दयीपणे गर्भवती पत्नीला हजार फूट उंचावरून खाली ढकलले असा गंभीर आरोप सेमराच्या कुटुंबियांनी केला आहे.

मिरर युकेच्या रिपोर्टनुसार, फिर्यादी पक्षाने दावा केली की पतीने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट आधीच रचला होता. यासाठी त्याने आपल्या पत्नीचा पर्सनल ऍक्‍सिडेंट इश्‍युरन्सही केला होता. घटनेनंतर त्याने चाळीस हजार पाऊंडच्या पेमेंटसाठी दावाही केला होता. या दरम्यान समोर आले की प्रकरणाचा तपास चालू आहे. यानंतर इन्श्‍युरन्स कंपनीने हा दावा तपास पूर्ण होईपर्यंत स्थगित केला.

या प्रकरणी मृत महिलेच्या भावाने सांगितले की ते बहिणीचा मृतदेह घेण्यासाठी जेव्हा फॉरेन्सिक मेडिसीन इन्स्टिट्यूटला पोहोचले तेव्हा हकान आधीपासूनच तेथे होता. त्याने सांगितले की बहिणीच्या मृत्यूमुळे आमच्या कुटुंबाला जबर धक्का बसला होता तर हकानच्या चेहऱ्यावर काहीच दु:ख नव्हते. हकानने आपल्या पत्नीच्या नावावर तीन कर्ज घेतली होती. या कर्जाला त्याच्या पत्नीचा विरोध होता.

दरम्यान, हकानने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. त्याने कोर्टात सांगितले की तो निर्दोष असून त्याने पत्नीची हत्या केलेली नाही. तो म्हणाला, सेल्फी घेण्यासाठी फोन बॅगमधून काढत होता. यावेळी पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले तर पत्नी तेथे नव्हती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.