नवी दिल्ली – सरकारी कार्यालयातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी कार्यालयाच्या ठिकाणी मंत्रतंत्र पुजा (Mantra tantra puja) केल्याच्या कारणावरून केरळमधील (Kerala news) एका महिला अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे. के ए बिंदू असे या महिला अधिकारीचे नाव असून त्यांना 16 नोव्हेंबर रोजी निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. त्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. (kerala Women officers suspended)
या संबंधात आपल्याला बचावाची संधी न देता किंवा आपले काहीही म्हणणे ऐकून न घेता आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण कार्यालयाची अधिकृत वेळ संपल्यानंतर संध्याकाळी साडे पाचच्या सुमाराला तेथे ही पुजा-प्रार्थना केली होती. त्यामुळे सरकारी कामकाजावर त्याचा कोणताहीं विपरीत परिणाम झाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
कामाशी संबंधित काहीं तणाव तेथे होता. आणि तो तणाव संपवण्यासाठी कांही मंत्रांचा व श्लोकांचा जप करण्याचा उपाय आपल्याला सुचवण्यात आला होता. त्यामुळे आपण तेथे ही उपाययोजना केल्याचे समर्थन त्यांनी केले.
या प्रकरणात कार्यालयातील एका माजी कर्मचाऱ्याने तक्रार केल्यानंतर त्याची रितसर चौकशी करून हीं कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी कृष्णा तेजा यांनी 11 नोव्हेंबर रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते आणि अहवाल मागवला होता. त्यानंतर निलंबनाचा आदेश काढण्यात आला असल्याचे समजते.