पुणे : दत्तवाडी परिसरात फिरस्तया राणी नावाच्या श्वानाला डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. भारती अशोक सांळुके ( ५२ वर्षे धंदा-व्यवसाय रा. ३०५ दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल खेडकर (रा.दत्तवाडी) याच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि ०८/११/२०२१ रोजी ११.०० वाजता दत्तवाडी परिसरात घडली. यातील फिर्यादी यांची फिर्याद की, दि ०८/११/२०२१ रोजी ११.०० वा सुमारास फिर्यादी त्यांचे राहते घराचे बाहेर उभे असताना जयमहाराष्ट्र मित्रमंडळ येथे मागील ९ ते १० वर्षापसुन फिर्यादी यांचे घराचे परीसरात राहणारी राणी नावाने ओळखतअसणारे श्वान हीस फिर्यादी यांचे गल्लीत राहणारे व त्यांचे तोंडओळखीचे अमोल खेडकर यांनी फिर्यादी यांचे समोर लोखंडी गज राणीच्या डोक्यात मारुन तीला जखमी केले व त्यामुळे राणी या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे फिर्यादी यांनी अमोल खेडकर याचेविरुदध कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक आर.जे.कस्पटे तपास करत आहेत