बुलडाणा – पतीला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार करण्यात आला आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच बुलढाणा जिल्ह्यात ही घक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीसात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोन अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील एक दाम्पत्य धाड येथे जात होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात संशयितांनी चिखला परिसरात त्यांची दुचाकी अडवली. पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केले.
याप्रकरणी पीडित महिलेने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरोधात मारहाण आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. अधिक तपास बुलडाणा पोलिस करत आहेत.