मुंबई – शोभिता धुलिपाला आणि ईशान खट्टर यांनी फॅशन डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांच्यासाठी शोस्टॉपर्स म्हणून रॅम्प वॉक केला. यावेळी दोघेही स्टायलिश आणि आकर्षक दिसत होते. यामुळे डिझायनर्सच्या लेटेस्ट कॉश्यूम कलेक्शनची जोरदार चर्चा झाली, पण यासोबतच आणखी शोभिताने ईशान इग्नोर केल्याची चर्चा अधिक झाली.
शोभिता आणि ईशान शो स्टॉपर म्हंटल्यावर दोघांसह या कार्यक्रमाची देखील चर्चा होणं सहाजिक होत. यावेळी दोघांमधील केमिस्ट्री देखील एकदम हॉट असल्याचे दिसून येत होते. जेव्हा जेव्हा शोस्टॉपर्स रॅम्पवर येतात तेव्हा ते एकमेकांना अभिवादन करतात आणि एकत्र पुढे जातात. पण इथे मात्र काहीस वेगळंच चित्र पाहायला मिळालं.
शोभिता तिच्या अटीट्युडमध्ये चालत आली आणि ईशान देखील स्टाईलमध्ये चालताना दिसला. अशात रॅम्पवर दोघे येताच दोघांमध्ये कॉर्डीनेशन दिसणं गरजेचं होत. मात्र यावेळी दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा देखील होती. दोघेही रॅम्पवर आल्यावर ईशानने शोभिताकडे पाहून पोज दिली मात्र शोभिताने ईशानकडे डुंकूनही पाहिलं नाही. यामुळे कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
View this post on Instagram
शोभिताने ईशानला इग्नोर केलं आणि हाच कार्यक्रमातील चर्चेचा विषय बनला. ऐन लाइमलाईटमध्ये असताना मॉडेलने आपल्या सहकाऱ्याला इग्नोर करण्याची फॅशन वर्ल्डसाठी ही पहिली घटना नाही. मात्र असं असलं तरी सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे.