वाघोली – शिरूर-हवेली चे लोकप्रिय आमदार अशोक पवार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्विनी संस्थेच्या वतीने शासनमान्य शिवभोजन
थाळी उपक्रमाची सुरुवात वाघोली मध्ये लोहगाव चौक येथे सुरू करण्यात आली असल्याची माहिती तेजस्विनी संस्थेच्या अध्यक्षा सारिका किरण पवार यांनी दिली आहे.
वाघोली तालुका हवेली येथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असून या वाढत्या लोकसंख्ये मध्ये बांधकाम मजूर तसेच अल्प उत्पन्न गटातील बांधवांसाठी एक वेळच्या जेवणाची व्यवस्था शासनाच्या माध्यमातून शिवभोजन केंद्राच्या मदतीने करण्यात आली असून शासनमान्य उपक्रमाची सुरुवात वाघोली मध्ये करण्यात आली आहे.
दि. 14 जुलै पर्यंत दररोज शंभर नागरिकांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती तेजस्वी सामाजिक संस्थे च्या अध्यक्षा सारिका पवार यांनी दिली.
या उपक्रमाच्या सुरुवात प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, किरण पवार, सामाजिक कार्यकर्ते सुजित शिंदे, मंदाकिनी पाटील, स्मिता चव्हाण, गणपत पानसरे, प्रकाश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघोली तालुका हवेली येथे शासन मान्य शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले असून दररोज शंभर नागरिकांना 14 जुलैपर्यंत मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
100 हून अधिक येणाऱ्या व्यक्तींना तेजस्वी सामाजिक संस्थेच्या वतीने नाममात्र शुल्कात जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वाघोली आणि पंचक्रोशीतील गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घ्या.
– सारिका पवार
(अध्यक्षा तेजस्विनी सामाजिक संस्था. पुणे)