बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित “काला’ चित्रपटाच्या माध्यमातून तो चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार असून यात बाबिलसोबत अभिनेत्री तृप्ती डिमरीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
View this post on Instagram
मागील वर्षी एप्रिल महिन्यातच इरफान ने जगाचा निरोप घेतला होता. त्यांचा आठवणीत बाबील नेहमीच सोशलवर व्हिडियो शेअर करत असतो. यावेळी त्याने इरफान खान यांचे काही फोटो एक इमोशनल कॅप्शनसोबत शेअर केले.
View this post on Instagram
या फोटोमध्ये इरफान खान बाबिलसोबत सोफ्यावर बसून बोलताना दिसत आहेत आणि त्यांच्या हातात सिगारेट आहे. या फोटोवर एक युजर्सने इरफान यांच्या हातात जॉइन्ट अर्थात गांजा आहे का असं विचारलं. यावर बाबीलने नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलॆ आहे.
View this post on Instagram
बाबीलने त्या नेटकऱ्याला उत्तर दिले की, ‘मला नाही माहीत तुम्हाला जॉइन्ट कुठे दिसला. पण तुमची अशीच इच्छा असेल तर शुभेच्छा. इथे कोणताही जॉइन्ट नाहीये मित्रा. ‘ असं म्हणत फोटोला ट्रोल करणाऱ्या युजर्सला कडक शब्दात उत्तर दिल आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलु अभिनेता अशी इरफान यांची ओळख होती.