मुंबई – काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनं विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार राहुल गांधी हेच असावे, असं म्हटलं होतं. यावर आता एका बॉलिवूड कलाकाराने प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचं म्हणत त्यांनी देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं, असं म्हटलं आहे.
काँग्रेस देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र याच काँग्रेसकडे अद्याप पूर्णवेळ अध्यक्ष नाही. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. मात्र त्याचवेळी विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. यावर बॉलिवूड अभिनेता केआरके याने शिवसेनेच्या भूमिकेशी सहमती दर्शवत, आपलं मत व्यक्त केलं.
केआरके याने ट्विट करून म्हटलं की, विरोधी पक्षांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करायला हवं. भारताचे पंतप्रधान बनण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या प्रादेशिक पक्षाचे नेते पुरेसे नाहीत.
Shiv Sena is 100% correct that opposition should declare #RahulGandhi their next PM candidate. No regional leader like #Mamta is enough popular to become PM of India.
— KRK (@kamaalrkhan) October 11, 2021
काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनं पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची दावेदारी नाकारताना शिवसेनेनं तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या पक्षांना खेळ बिघडवणारे पक्ष म्हणून टीका केली होती..