बारामती: अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापा; तपास संपवून पहाटे 2:30 वाजता गेले अधिकारी; साडेचार दिवस सुरू होती तपासणी

बारामती – बारामतीत गुरूवारी पहाटे सहा वाजता आयकर विभागाने छापे टाकले. त्यानंतर साडे चार दिवस कागदपत्रे तसेच आर्थिक स्थितीची तपासणी सुरू राहिली. सोमवारी पहाटे अडीच वाजता तपासणी संपवून अधिकारी गेले.

बारामतीत गुरूवारी अचानक सकाळी सहा वाजता आयकर खात्याचे पथक एकाच वेळी दोन ठिकाणी आले. काटेवाडी येथील एका संचालकाच्या घरी, त्यानंतर संचालकाच्या बारामतीतील घरी पथकाने छापेमारी केली. त्याचवेळी बाारामतीतील श्रायबर डायनामिक्स या दुध प्रकल्पातही त्याचवेळी पथक पोचले होते.

एकाच वेळी बारामती तालुक्यात दोन ठिकाणी ही छापेमारी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. मात्र त्याचवेळी आलेल्या माहितीने आणखीच चिंतेत भर पडली होती. एकाच वेळी आयकर खात्याच्या पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय व नातेवाईकांच्याही घरी तपासणी सुरू केली होती.

ही तपासणी दोन दिवस सुरू राहील असे सुरवातीला सांगण्यात आले. मात्र त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या दिवशीही ही तपासणी सुरू राहील्याने चर्चा वाढली होती. मात्र सोमवारी पहाटे अडीच वाजता ही तपासणी पूर्ण करून अधिकाऱ्यांच्या पथकाने बारामती सोडली. आता या तपासणीतून त्यांच्या हाती काय लागले हे येत्या काही दिवसांत कळेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.