“तुम्ही महाराष्ट्रात कशा फिरता ते बघतोच…” शिवसेना खासदाराची नवनीत राणांना धमकी

नवी दिल्ली – लोकसभेत आज महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे सरकारला लक्ष्य केल्यानंतर आपल्याला शिवसेना खासदाराकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप राज्यातील खासदार नवनीत कौर राणा यांनी केला आहे. त्यांनी याबाबतचे पत्र लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पाठवले असून पंतप्रधान, गृहमंत्री, संसदीय कार्यमंत्री यांनाही त्या पत्राची प्रत पाठवली आहे.

खासदार राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीच धमकावल्याचा आरोप केला आहे. तुम्ही महाराष्ट्रात कशा फिरता ते बघतोच, तुम्हालाही जेलमध्ये टाकतो अशा शब्दांत आपल्याला धमकावण्यात आल्याचे राणा यांचे म्हणणे असून हा केवळ आपलाच नाही, 

तर देशातील प्रत्येक महिलेचा अपमान असून या प्रकरणी सावंत यांच्यावर कठोरात कठोर पोलीस कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

यापूर्वीही शिवसेनेच्या लेटरहेडवर आलेल्या पत्राद्वारे अथवा फोनवर आपल्याला चेहऱ्यावर ऍसिड फेकू, ठार करू अशा प्रकारे धमकावण्यात आले असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.