शिक्रापूर -शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शितोळे महाराजाने अंगामध्ये दैवीशक्ती असल्याचे भासवून सुमारे 25 लाख रुपये उकळल्याचे तपासात समोर आले आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथून गेलेल्या एका व्यक्तीचा महाराज असलेल्या अजित पांडुरंग शितोळे (रा. न्हावी सांडस) व त्यांच्या साथीदाराने अपहरण केल्याच्या संशयातून बेपत्ता व्यक्तीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अजित शितोळेसह ईश्वर ढगे, रोहिदास गायकवाड (दोघे रा. आपटी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध अपहरण व आदी गुन्हे दाखल केले होते. शिक्रापूर पोलिसांनी तिघांना अटक केली.
शिरूर न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे. पोलिसांनी त्यांच्यासह इतरांकडे चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फसवणूक, अंधश्रद्धाबाबतचे गुन्हे दाखल केले आहेत. तिघांना उद्या न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे.