विद्याधाम प्रशालेच्या सृष्टी आवटीस गणितात 100 गुण प्राप्त
शिरूर(प्रतिनिधी) : शिरूर शहरातील आर. एम. डी. धारिवाल, न्यू इंग्लिश स्कूल, विजयमाला विद्या मंदिर या शाळांचा दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्याधाम शाळेची सृष्टी आवटी या विद्यार्थिनीने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून प्रशालेचे नाव उंच केले आहे.
विद्याधाम प्रशाला (शिरूर,पुणे)
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत एकूण 412 विद्यार्थीपैकी 411 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एसएससी परीक्षेचा निकाल 99.75 टक्के लागला आहे. यामध्ये एकूण 84 विद्यार्थ्यांना शेकडा नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण तर एकूण 258 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सृष्टी आवटी विद्यार्थिनीस गणित विषयात 100 गुण प्राप्त झाले आहेत. प्रशालेतील पूजा मोहन बोरकर(99 टक्के), सृष्टी चांगदेव आवटी (97 .40 टक्के), दिव्या गणेश भळगट( 97. 40 टक्के) आणि गौरी सुधीर थोरात (97 .20 टक्के) हे विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय सुकुमार जी बोरा, शाळा समितीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत जी बाफना , संस्थेचे सचिव गुरुवर्य परदेशी सर, संस्थेचे सहसचिव बाबासाहेब चोरमले, मुख्याध्यापक तांबोळी सर, उपमुख्याध्यापक जैन सर, पर्यवेक्षक काकडे सर, शिंदे सर तसेच सौ पटेल मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूल (शिरूर,पुणे)
शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शिरूर शाळेचा इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के, तर मराठी माध्यमाचा 99.5 टक्के निकाल लागला असल्याची माहिती मुख्याध्यापिका ए. ए. डोंगरे यांनी दिली आहे. शाळेमध्ये अक्षता मनोज कापरे (94.20 टक्के), अथर्व चंद्रकांत कुलकर्णी
(93.40 टक्के) ,सौरभ भाऊसाहेब थोपटे (92.40 टक्के) विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. न्यू इंग्लिश शाळेच्या इंग्रजी माध्यमाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली तर मराठी माध्यमाचा 99.5 टक्के निकाल लागला असून या विभागातील निकालामध्ये वाढ झालेली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण, मुख्याध्यापिका ए. ए. डोंगरे, माजी मुख्याध्यापक साहेबराव चांगले यांनी अभिनंदन केले आहे.
रसिकलाल माणिकचंद धारिवाल स्कूल (शिरूर, पुणे)
शिरूर शहरातील रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा (आर एम डी) १०० टक्के निकाल लागला असून, शाळेने यंदाही यशाची परंपरा कायम ठेवली असल्याचे मुख्याध्यापिका अश्विनी घारू यांनी सांगितले. शाळेच्या वतीने यंदा 122 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी अठरा विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण मिळाले आहे.
आर एम डी शाळेमध्ये आकांक्षा सखाराम साळके (97. 40टक्के), तन्मय ताराचंद देसर्डा (95.20 टक्के) व अंकिता आनंद मलगुंडे (95.20टक्के) आणि यशराज पद्मकांत दुधे (94.80 टक्के) या विद्यार्थ्यांनी यश मिळवत अनुक्रमे प्रथम,व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा, उपाध्यक्ष चंद्रकांत बाफना, आर एम डी शाळेचे चेअरमन शिरीष, सचिव तु.म. परदेशी, सचिव बाबासाहेब चोरमले, मुख्याध्यापिका अश्विनी घारू व पर्यवेक्षक श्री. श्रीमाळ यांनी अभिनंदन केले आहे.
विजयमाला विद्यामंदिर स्कूल (शिरूर,पुणे)
शिरूर येथील विजयमाला विद्यामंदिर स्कूलने यशाची परंपरा कायम राखत यंदा शंभर टक्के निकाल लागला असल्याचे मुख्याध्यापिका मारिया साठे यांनी सांगितले.
शाळेमध्ये विधी विनोद बोथरा (95.20 टक्के),वैष्णवी अनिल दूडे (93.60), मुक्ताई गजानन बोरे (91.00 टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम,व्दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर श्रुती प्रशांत फलटणकर (90.60 टक्के), आर्यन राजेंद्र नगरे (88.60 टक्के), कुणाल कुंडलिक भोसले (87.60 टक्के) या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र थिटे मुख्याध्यापिका मारिया साठे यांनी अभिनंदन केले आहे.