राजगुरूनगर (प्रतिनिधी) – धुवोली (ता. खेड) गावाच्या हद्दीत नेकलेस धबधब्याजवळ सोमवारी (दि. 11) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळ्याने शिरूर-भीमाशंकर राज्यमार्ग बंद झाला होता. भीमाशंकरकडे व परतीच्या मार्गावरील भाविक अडकून पडले होते.
स्थानिकांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. महसूल प्रशासनाच्या आणि स्थानिकांच्या मदतीतून तब्बल पाच तासांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
गेल्या तीन दिवसांपासून खेडच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे या भागातील रस्त्यावर दरडी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धुवोली व शिरगाव गावाच्या हद्दीजवळ वाजदरी येथे दरड कोसळली. शिरूर-वाडा मार्गे भीमाशंकर रस्त्यावर अव्हाट येथील शाळेच्या मुलांना घेवून जाणारी बस पुढे गेल्यानंतर काही मिनिटांत दरड कोसळली, त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मांजरी बुद्रुक येथे मुळा- मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ
दरड कोसळल्यानंतर माती, दगड रस्त्यावर आल्याने भोरगिरी-भीमाशंकर रस्त्यावर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी जवळच्या गावातील नागरिक रस्ता मोकळा करण्यासाठी मदतीला धावून आले. तर तालुका अपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी घटनास्थळी रवाना होत वाहतूक सुरळीत करण्यास भूमिका बजावली.
पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १३ जुलैला