“शेलार टीव्हीएस’ – गतिमान युगातील आधुनिक सुविधासंपन्न विश्‍वासार्ह सेवा

पुणे: आपण घरात दुचाकी घेण्याचा विचार करतो किंवा त्या निर्णयापर्यंत पोहोचतो आणि काही तासांमध्येच तुमच्या दारात दुचाकी उभी राहिली तर… तुम्हाला अशा तत्पर सेवेचा अनुभव निश्‍चितपणे मिळू शकतो. होय “शेलार टीव्हीएस’मुळे हे शक्‍य होते आहे…!

अनेक महिने आणि वर्षाच्या मेहनतीने पै न पै जमा करून दुचाकी घेण्याचे स्वप्न अनेकजण पूर्ण करत असत. प्रत्येकालाच ते शक्‍य होत होते असेही नव्हते. मात्र हे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आणण्याचे कामही “शेलार टीव्हीएस’ने केले आहे.

योग्य व पुरेशा कागदपत्रांच्या आधारे आणि अटी शर्तींच्या अधीन राहून “शेलार टीव्हीएस’ मधून आपल्या हक्काच्या दुचाकीचे खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाते. त्यामध्ये एखादी गृहिणी असेल, नोकरदार असेल वा विद्यार्थी किंवा घरेलु कामगार… इथे प्रत्येकासाठी येणाऱ्या अडचणींसाठीचा उपाय शोधून तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत केली जाते.

“शेलार टीव्हीएस’ मधून दुचाकी खरेदीसंबंधाने असा अनुभव आम्हाला येतो की, एकदा आमच्याकडून दुचाकी खरेदी करून गेलेला ग्राहक त्याला मिळालेल्या विक्री पश्‍चात सेवेसंबंधाने इतका समाधानी असतो की, त्या व्यक्तीसमवेत त्याचे नातेवाईक, स्नेहीजन, मित्रमंडळीही देखील आमच्याशी जोडले जातान दिसतात. प्रत्येक समाधानी ग्राहकागणिक अशा वाढत जाणाऱ्या “शेलार टीव्हीएस’ परिवाराचा आमच्याप्रती विश्वास कायम राहावा असाच आमचा प्रयत्न असतो, असे शेलार टीव्हीएसमचे सरव्यवस्थापक प्रदीप सावंत यांनी सांगितले.

रोखीने दुचाकी घेणाऱ्यांचा काही प्रश्‍न येत नाही, मात्र वाहन कर्ज काढून दुचाकी घेऊ इच्छिणाऱ्यांनाही आम्ही त्यांची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्याला आम्ही सर्वतोपरी मदत करतो. यासाठी त्यांनी विविध बॅंकांशी करार (टायअप) केला आहे.
दरम्यान आम्ही येणाऱ्या शैक्षणिक हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसाठीही आकर्षक योजना आणल्या आहेत. त्यांच्या गुणपत्रिकेच्या आधारे गुणांची पारख करून त्यांना डिस्काऊंटही दिला जाते.

एवढेच नव्हे तर आता गाड्यांना वेटिंग हा प्रकार राहिलेलाच नसून संपूर्ण 30 दिवसांचा स्टॉक आम्ही आमच्याकडे उपलब्ध करून देतो. याचमुळे महिन्याला सुमारे 1800 ते 2000 दुचाकी विकल्या जातात. विशेष म्हणजे पुणे महानगरात सर्वाधिक दुचाकी विक्रीचा विक्रम देखील “शेलार टीव्हीएस’ च्या नावावरच आहे. यासाठी “शेलार टीव्हीएस’ ला विशेष पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

सध्या “एन्टॉर 125 सीसी’ आणि “ज्युपिटर’ या मॉडेलला मागणी जास्त आहे. “एन्टॉर’ मध्ये “जीपीएस’सारखी आधुनिक यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या सगळ्या यंत्रणांची माहितीही आमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी व कुशल तंत्रज्ञांना दिली जाते. ही माहिती वाहन बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये नेऊन दिली जाते.

गाडी घेतल्यानंतर त्याला देखभाल व दुरुस्ती सोय पुरवण्याचेही काम “शेलार टीव्हीएस’ तर्फेच केले जाते. त्यामुळे एकदा गाडी घेतली की त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ही आमची आहे असे आम्हाला वाटते आणि तसा विश्‍वासही आम्ही ग्राहकांना देतो असे सावंत यांनी नमूद केले.

पर्वती, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, स्वारगेट, पौडरस्ता, चांदणी चौक, धनकवडी या सात शाखांचा विस्तार हा केवळ ग्राहकांच्या विश्‍वासावर झाला आहे, असे सावंत यांनी सांगितले. हाच विश्‍वास कायम ठेवत आम्ही वाहनांच्या सर्व्हिसिंगची धुराही हाती घेतली आहे. या सर्व शाखांमधून महिन्याला सुमारे 10 हजारांहून अधिक दुचाकींची सर्व्हिसिंग केली जाते. सर्व्हिसिंगचा फीडबॅकही ग्राहकाला विचारला जातो. ग्राहकांच्या ज्या काही समस्या असतील किंवा रेग्युलर सर्व्हिसिंग असेल ती एका दिवसात करून दिली जाते. मात्र आता त्यामध्येही सुधारणा करून आधुनिक टेक्‍नॉलॉजीच्या सहाय्याने केवळ दोन-चार तासांमध्येच सर्व्हिसिंग होऊन गाडी तुमच्या हातात दिली जाणार आहे, असे त्यानी सांगितले.

पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, बालाजीनगर आणि सिंहगड रस्ता येथे वर्कशॉप्स आहेत. नमूद केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून भारतातील सर्वात मोठा वर्कशॉप बालाजीनगर येथे आम्ही साकारणार आहोत, अशी माहिती सावंत
यांनी दिली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.