पुणे – रोटेरियन शेखर मेहता यांची रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्ष2021-22 या पदासाठी निवड झाली आहे. जागतिक स्तरावर रोटरी इंटरनॅशनल अध्यक्षपद भूषवणारे शेखर मेहता हे चौथे भारतीय ठरले आहेत.
रोटरीच्या बहुआयामी कार्यांमध्ये महिला सशक्तीकरणावर जास्त काम कामगिरी करण्याचा त्यांचा मानस आहे. दि. 1 जुलै रोजी त्यांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला. रोटरी संघटनेमार्फत जागतिक पातळीवर काम करण्याची व मैत्री वाढवून समाजसेवा करण्याची दुर्मिळ संधी प्राप्त होते, याचे हे एक उदाहरण होय.
समाजात बदल आणण्यासाठी सर्व रोटेरियन्स एका छत्रछायेखाली अविरत प्रयत्नशील असतात. रोटरी फाउंडेशनमध्ये प्रतिवर्षी लक्षावधी डॉलर्सची मदत करतात.