Share Market 23 April 2024 : मंगळवारी, 23 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 90 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी 22,350 च्या वर बंद झाला. यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
व्यापक बाजारात चांगली खरेदी दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.52 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.05 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. सेक्टरल इंडेक्स पाहिले तर, आजच्या व्यवहारात एफएमसीजी, आयटी, पॉवर आणि रियल्टी समभागांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर फार्मा, धातू, तेल वायू आणि ऊर्जा निर्देशांक 0.3 ते 0.8 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 89.84 अंकांनी किंवा 0.12% ने वाढून 73,738.45 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 31.60 अंकांनी किंवा 0.14% ने वाढून 22,368.00 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी ₹1.82 लाख कोटी कमावले –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 23 एप्रिल रोजी वाढून 399.68 लाख कोटी रुपये झाले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 22 एप्रिल रोजी 397.86 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 18 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 3.38 टक्के वाढ झाली आहे. यानंतर नेस्ले इंडिया 1.77, मारुती सुझुकी 1.53, टाटा मोटर्स 1.34 आणि एचसीएल टेकचे शेअर्स 1.42 % पर्यंत वाढले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर सेन्सेक्समधील उर्वरित 12 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही सन फार्माचा शेअर 3.63 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरला. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) 1.42, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) 1.00, टेक महिंद्रा 0.63 आणि बजाज ऑटोचे शेअर्स 0.58 % घसरून लाल रंगात बंद झाले.
2,064 समभागांमध्ये वाढ झाली –
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,934 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2,335 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,480 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 119 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 257 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 9 समभागांनी त्यांच्या नव्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.