सासवड, (प्रतिनिधी) – झेंडेवाडी (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शरद सदाशिव झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून शिवाजी सोपान खटाटे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्तजागी निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम भामे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली.
यावेळी शरद झेंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम भामे यांनी जाहीर केले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी संतोष काशिद यांनी कामकाज पाहिले. माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच शरद झेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
भाजप पुरंदर-हवेली विधानसभा प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी उपसरपंच वंदना खटाटे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खटाटे, पूनम झेंडे, कौशल्या झेंडे, सोनाली झेंडे, अमर झेंड, दिवे गावचे सरपंच योगेश काळे, माजी सरपंच गुलाबतात्या झेंडे,
अमित झेंडे, युवानेते अविनाश झेंडे, माजी सरपंच सोनाली झेंडे, अध्यक्ष गणपत शितकल, उद्योजक माऊली खटाटे, अजित गोळे, दादा झेंडे, सतीश झेंडे, अण्णा झेंडे, अमोल झेंडे, मदन गायकवाड, संदीप झेंडे, सूर्यकांत झेंडे, बबन झेंडे, फुलाबाई झेंडे, विकास झेंडे, नवनाथ झेंडे आदीसह झेंडेवाडीकर उपस्थित होते.