Sharad Pawar : शुक्रवारी कर्जतमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचं वैचारिक मंथन शिबिर पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांना थेट लक्ष्य केलं होतं. त्यानंतर काल पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर आपली भावना व्यक्त केली.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘अजित पवारांनी राजकीय निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे. फक्त तक्रार एकच आहे की, त्यांना आता निर्णय घेण्याऐवजी निवडणुकीचा फॉर्म भरला. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नावाने घेतला.
अजित पवारांना देण्यात आलेलं तिकीट हे जयंत पाटील किंवा माझ्या सहीचं असेल. लोकांच्या समोर राष्ट्रवादीसाठी मते मागितले. त्यानंतर त्याच्याशी विसंगत भूमिका घेणे मला मान्य नाही, अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली.
दरम्यान, आता यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही.
मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणं, योग्य नाही..’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.