पुणे – राज्यात शिक्षण संस्थाचा विस्तार झाला; परंतु शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी हवे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी खंत व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढील काळात गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
कॅम्प एज्यूकेशन सोसायटी संचलित रास्ता पेठ येथील चैतन्य इंग्रजी माध्यम शाळेचे डॉ. सायरस एस. पुनावाला इंग्रजी माध्यम शाळा आणि सोसायटीच्या सोलापूर बाजार येथील उत्कर्ष इंग्रजी माध्ममाच्या शाळेचे विलु पुनावाला इंग्रजी माध्यम शाळा असे नामकरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे डॉ. सायरस पुनावाला, आदर पुनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांच्यासह आदी उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, सध्या गुण देण्याच्या पद्धतीत काही बदल झाला आहे का, हेही पाहणे गरजेचे असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यावेळी डॉ. सायरस पूनावाला यांनी मनोगत व्यक्त केले.