Sharad Pawar on Raigad। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचे पर्याय दिले होते. त्यात कपबशी, वटवृक्ष आणि तुतारीचा समावेश होता. निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले.
शरद पवार याच चिन्हाचे अनावरण शनिवारी किल्ले रायगडवरुन करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत.
रोप वे अन् पालखीतून प्रवास Sharad Pawar on Raigad।
रायगड किल्ला चढण्यासाठी अवघड आहे. यामुळे शरद पवार रोप वे च्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर पोहचले. त्यानंतर पालखीच्या माध्यमातून त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आले. रोपे वे ते कार्यक्रम स्थळ जाण्यासाठी बरच अंतर चालत जावं लागतं. शरद पवारांना इतके चालणे शक्य नाही. त्यामुळे पालखीच्या साह्याने त्यांना कार्यक्रमस्थळी नेण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेचा ताफाही सोबत होता.
शरद पवार गटाचे सर्वच नेते किल्ले रायगडावर पोहचलेत. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. त्या चिन्हाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावरुन शरद पवार गटाची ‘तुतारी’ फुंकली जाणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून ट्विट केले आहे. शरद पवार गटाच्या त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आता अवघा देश होणार दंग,आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग!