विद्या बालन साकारत असलेल्या शकुंतला देवींवरील सिनेमा पुढच्या वर्षी मे महिन्यात रिलीज होणार आहे. 8 मे रोजी हा बायोपिक रिलीज होणार आहे. विद्या बालन ज्यांचा रोल करते आहे, त्या शकुंतला देवींना “ह्युमन कॉम्प्युटर’ असे म्हटले जात असे. विद्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. प्रचंड बौद्धिक सामर्थ्य असलेल्या शकुंतला देवी 8 आकडी संख्येचे गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी मिनिटांमध्ये तोंडी करून दाखवत असत. वयाच्या 5 व्या वर्षी त्यांच्यातील ही विलक्षण शक्ती समोर आली होती. त्यावेळी त्यांनी 18 वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेले गणित अगदी लिलया सोडवले होते. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्यावरील “सुपर 30′ मध्ये हृतिक रोशनने केलेल्या कामालाही प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता.
शकुंतला देवींवरील या सिनेमामध्ये सान्या मल्होत्रा आण्इ जिशू सेनगुप्ताही सहकलाकार म्हणून असणार आहेत. ज्या शकुंतला देवींवरील बायोपिकमध्ये विद्या काम करनार आहे, त्यांची 90 वी जयंत नुकतीच 4 नोव्हेंबरला होऊन गेली. विद्याने अगदी आवर्जुन शुंकतला देवींचे स्मरण या दिवशी केले आणि त्यांना आदरांजलीही वाहिली होती.