shahrukh khan – आपला बहुचर्चित डंकी हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या पाश्र्वभूमीवर अभिनेता शाहरूख खान याने आज येथील वैष्णोदेवी मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. या अभिनेत्याचे या भेटीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडीयातून समोर आले आहेत, ज्यात तो यात्रेकरूंसोबत सुरक्षेत फिरताना दिसत आहे.
आपला चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी धार्मिक स्थळांना भेट देण्याची त्याची पद्धत आहे. याआधी, त्याने जानेवारीत त्याचा ‘पठाण’ रिलीज होण्यापूर्वी आणि ‘जवान’ रिलीज होण्यापूर्वी प्रसिद्ध मंदिरांना भेटी दिल्या होत्या.
डंकी हा सिनेमा २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. डंकीमध्ये शाहरुख खान सोबत बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर हे सहकारी कलाकार आहेत. याची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे.
डंकी ही चार मित्रांची आणि परदेशी वारीची हृदयस्पर्शी कथा आहे. त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी ते ज्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात त्या प्रवासाचे चित्रण यात आहे. वास्तविक जीवनावर आधारीत ‘डंकी’ ही प्रेम आणि मैत्रीची गाथा आहे.