नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेले अॅडव्होकेट संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन चर्चा करण्यासाठी शाहीन बागेत पोहोचले आहेत. शाहीन बागेत पोहचल्यानंतर संजय हेगडे म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथे आलो आहोत. आम्हाला आशा आहे कि आम्ही सर्वांशी संवाद साधू. सर्वांच्या सहकार्याने हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
Delhi: Sanjay Hegde and Sadhana Ramachandran — mediators appointed by Supreme Court speak to the protesters at Shaheen Bagh. pic.twitter.com/vAInhlXgLQ
— ANI (@ANI) February 19, 2020
यावेळी उपस्थित पत्रकारांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी उपस्थित आहे.