ट्रम्प यांच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात

मोटेरा स्टेडियमवर नमस्ते ट्रम्प

साबरमतीत चरखा चालवणार

ताजमहालचे सौंदर्य अनुभवणार

उद्योगपतींना भेटणार

संयुक्त पत्रकार परिषद

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत भेटीच्या तयारीला वेग आला असून अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम येथे मेगा इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहे. तर त्यांची ताजमहाल येथेही भेट ठरवण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया हे 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत भेटीवर येत आहेत.

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर फोर्स वन विमान उतरेल त्यावेळी या दाम्पत्याच्या स्वागताला पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीने हजर असतील. तेथून हे दोन नेते 22 किमीचा रोड शो करतील. विमानतळापासून सुरू झालेला हो रोड शो मोटेरा स्टेडियमध्ये संपेल. तेथे नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमात ट्रम्प मार्गदर्शन करतील.

ट्रम्प यांच्या सुरक्षिततेची जय्यत तयारी करण्यात आली असून अहमदाबादमध्ये सुरक्षितता वाहने दिसू लागली आहेत. अमेरिकेतून आलेल्या सुरक्षा अधिाकाऱ्यांसमवेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकासह पुरातत्व विभागाचे अधिकारी ट्रम्प यांचव्या भेटी आधी ताजमहालची तपासणी करतील.

ट्रम्प यांचा कार्यक्रम

या महत्त्वाच्या बातम्या वाचलात का?

ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या पहिल्या दिवशी साबरमती आश्रमास भेट देतील. तेथे हे दोन नेते सुमारे 15 मिनिटे असतील. तेथे ट्रम्प यांना चरखा भेट देण्यात येईल. त्याचबरोबर महात्माजींचा काळ आणि जीवनपट ऊलगडणारी दोन पुस्तके भेट देण्यात येतील. बापूजी आणि कस्तूरबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या हृदयकुंज कुटीत राष्ट्राध्यक्ष सपत्नीक काही काळ चरख्यावर सुतकताई करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमाप्रमाणे आयोजित नमस्ते ट्रम्प या मोटेरा स्टेडियमवरील कार्यक्रमास सुमारे सव्वा लाख लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि बॉलिवूड कलाकारांच्या अदाकारी अपेक्षित आहेत.

या कार्यक्रमानंतर मोदी आणि मान्यवरांसोबत राष्ट्राध्यक्ष भोजन घेतील. तेथून ते विमानाने ताजमहाल पाहण्यासाठी रवाना होतील. ताजमहालच्या परिसरात ते दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास अपेक्षित असून तेथे सुमारे 30 ते 45 मिनिटे असतील.

सोमवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प राष्ट्रपतीभवनात एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. तेथून राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर नतमस्तक होतील. त्यानंतर हैदराबाद हाऊस येथे द्वीपक्षीय चर्चेत ते सहभागी होतील. त्यानंतर ते भोजन घेतील. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प संयुक्‍त पत्रकार परिषद घेतील. पत्रकार परिषद झाल्यावर अमेरिकन दुतावासाला भेट देऊन तेथे देशातील नामवंत उद्योगपतींची भेट घेतील. त्यात दोन्ही देशातील आर्थिक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा होईल.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या मेजवानीला उपस्थित राहून ट्रम्प रात्री दहाच्या सुमारास अमेरिककडे प्रयाण करतील.

भारत दौऱ्यासंबंधी अत्यंत उत्सुक!- डोनाल्ड ट्रम्प

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.