मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची भारतासह परदेशातही मोठी क्रेझ आहे. नुकतेच शाहरुखच्या मुंबईतील ‘मन्नत’ या घराबाहेर चाहत्यांनी एक नवा विश्वविक्रम केला आहे. पठाण या गाण्यावर जवळपास 300 पेक्षा अधिक लोकांनी 30 सेकंदाहून अधिक वेळ शाहरुखच्या आयकॉनिक पोजमध्ये उभे राहून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.
शाहरुखची प्रत्येक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची नेहमीच मन्नत बाहेर गर्दी झालेली दिसते. त्याच्या याच आयकॉनिक पोजचा विश्वविक्रम करुन चाहत्यांनी शाहरुखला अनोखी भेट दिली आहे. यावेळी देखील शाहरुख त्याच्या चाहत्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. ज्यावेळी मन्नत बाहेर चाहत्यांनी हा विश्वविक्रम घडवला त्यावेळी शाहरुख देखील चाहत्यांच्या जल्लोषामध्ये सहभागी झाला. यावेळी गिनीज बुक कडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर शाहरुखने त्याची स्वाक्षरी करून चाहत्यांचे आभार मानले.
Shah Rukh Khan’s stardom shines bright from Mannat’s terrace, captivating hearts with effortless charm and timeless charisma @NeonMan_01 @neuzboy pic.twitter.com/pAreUoEylG
— srkian (@ArmyDemonation) June 10, 2023
या खास विश्वविक्रमासाठी शाहरुखच्या पठाण चित्रपटातील गाण्याची निवड करण्यात आली होती. यावेळी शाहरुखने देखील या गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय त्याने आयकॉनिक पोजही दिली. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH | Actor Shah Rukh Khan waves to his fans outside ‘Mannat’ to celebrate the world TV premiere of his film ‘Pathaan’. pic.twitter.com/jXTvsuNeQT
— ANI (@ANI) June 10, 2023
दरम्यान, काही कालावधीनंतर शाहरुखने ‘पठाण’मधून कमबॅक केला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा गल्ला जमवला. आता लवकरच तो 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘जवान’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो ‘डंकी’ चित्रपटातही दिसणार आहे.