Shafiqur Rahman Barq : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकातामध्ये भाजपच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. सभेला संबोधित करताना,”त्यांनी ममता बॅनर्जींना नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (CAA) लागू करण्याबाबत असे आव्हान दिले आहे, ज्यामुळे संपूर्ण देशात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान वर्क यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी,”ममता बॅनर्जींना पराभूत करणे भाजपला शक्य आहे असे म्हटले आहे.
यूपीचे संभलचे खासदार शफीकुर रहमान वर्क यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी “भाजप ममता बॅनर्जींना पराभूत करू शकत नाही. राज्यातील मुस्लिम ममतासोबत आहेत. ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये भाजपचा पराभव केला आहे.” असे म्हटले.
तसेच पुढे बोलताना,”नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याच्या अमित शहांच्या आव्हानाचाही सपा खासदार वर्क यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सीएए लागू करणे सोपे काम नाही, संपूर्ण विरोधक याला विरोध करत आहेत. सीएए लागू व्हावा अशी विरोधकांची इच्छा नाही.” म्हणत अमित शहांचे वक्तव्य खोदून काढले.
दरम्यान, बंगालच्या दौऱ्यावर असलेले अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख करताना म्हटले होते की, याला कोणीही रोखू शकत नाही. हे थांबवणे ममता बॅनर्जींच्या अधिकारात नाही, असे शाह म्हणाले. मोदी सरकार त्याची अंमलबजावणी करत राहील. हा देशाचा कायदा आहे आणि ममता बॅनर्जी किंवा कोणीही ते रोखू शकणार नाही. शाह यांच्या आधी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा टेनी यांनीही रविवारी पश्चिम बंगालमध्ये सांगितले होते की, CAA अंतर्गत नियम मार्च 2024 पर्यंत ठरवले जातील.
सीएए कायद्याला टीएमसीसह देशातील विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. ममता बॅनर्जी सरकारने ते पूर्णपणे असंवैधानिक घोषित केले होते. याबाबत देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने झाली.