हैदराबाद – आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती मिळाल्यामुळे भडकलेल्या पित्याने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्याची घटना आंध्र प्रदेशात घडली आहे.
विशाखापट्टणम जिल्ह्यातील जट्टादा गावात हा प्रकार घडला. आरोपीच्या मुलीवर संबंधित कुटुंबातील एकाने अत्याचार केले होते. त्याची माहिती आरोपी पित्याला मिळाल्यावर त्याने रागाच्या भरात त्या कुटुंबावर हल्ला करत सहा जणांना ठार केले. मात्र ज्याने अत्याचार केले तो फरार झाला असून संबंधित पित्याला अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक हत्याकांडामुळे मात्र प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस तपास करत असल्याचे सांगण्यात आले.