नगर – आताची सर्वात मोठी बातमी नगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरातील अंबर प्लाझा इमारतीला भीषण आग लागली असून घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दल तत्काळ दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
आग लागल्याचे समजतात आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत परिसराची पाहणी करून प्रशासनाला मार्गदर्शन केले. आगीची माहिती समजताच जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला हे घटनास्थळी येऊन दुर्घटनेची माहिती घेतली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी नागरिकांनी आग पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.