नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त 42 जवानांना अग्निशमन सेवा पदके घोषित करण्यात आली आहेत. यापैकी एका जवानास राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक आणि 2 जवानांना त्यांच्या संबंधित शौर्याबद्दल, शौर्यासाठीचे अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक 9 कर्मचाऱ्यांना आणि 30 कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदक यांची घोषणा करण्यात आली.
याव्यतिरिक्त, 25 कर्मचारी, स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदके देखील जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे गृहरक्षक आणि नागरी संरक्षण पदक तसेच गृहरक्षक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नागरी संरक्षण पदकांनी अनुक्रमे 2 आणि 23 कर्मचाऱ्यांना घोषित करण्यात आले.
महाराष्ट्रातील फायरमन बाळू दामू देशमुख यांना बचावकार्यासाठी मरणोत्तर शौर्यासाठीचे राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले. प्रशांत दादाराम रणपिसे (मुख्य अग्निशमन अधिकारी) यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर करण्यात आले.
गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट सेवांसाठी अग्निशमन सेवा पदक प्राप्त करणाऱ्यांमधे महाराष्ट्रातील किरण बालमुकुंद गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, संजय यशवंत मांजरेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सुरेश विष्णू पाटील, लिडींग फायरमन, संजय दत्ताराम म्हामुणकर, लिडींग फायरमन, चंद्रकांत नारायण आनंददास, फायरमन यांचा समावेश आहे.