पुणे – पुणे जिल्ह्यात इन्स्टाग्राम या समाजद्वारे शस्त्र मागवल्याचे आणि त्याचा पुरवठा झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभराजे देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
आमदार राहूल कुल यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. कुल म्हणाले, पुण्यात गावठी 5 पिस्तूल, 19 जिवंत काडतुसं सापडली. हे खूप गंभीर आहे. पाटस आणि दौंड पोलिस स्टेशन देखील प्रलंबित आहेत.
देसाई यांनी या प्रश्नाल उत्तर दिले. ते म्हणाले, सोशल मीडियाचा वापर शस्त्र मागवण्यासाठी होत आहे. इन्स्टाग्रामवरुन ही सर्व शस्त्रे मागवण्यात आली होती. यात आठपैकी 6 आरोपी पकडले, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. परराज्यात 1 टीम पाठवली होती. पण बाकीचे आरोपी आढळले नाहीत. आता पुन्हा टीम पाठवू.
वाळू माफियाकडून हल्ला
जळगाव जामोद या ठिकाणी वाळू माफियाला वाळू वाहतूक करण्यासाठी विरोध केल्यानंतर एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याबाबत शंभुराजे देसाई म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र या तीनही आरोपींनी कोर्टात जाउन अंतरीम जामीन घेतला आहे. ते रद्द करण्याचा प्रयत्न करत आहोत.