नवी दिल्ली – यंदाच्या वर्षी पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तवला आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही पावसाळी महिन्यात चांगाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही भाकीत करण्यात आलेले नाही. मात्र एप्रिलच्या सुरुवातीला त्यांचेही अंदाज येण्याची शक्यता आहे. यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाचे हवामान खाते हे त्याच्या अचूक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यान, यावर्षीही देशासह राज्यासाठी पावसाळा सुखावणारा होता. देशातील बहुतांश भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अशातच ऑस्ट्रेलियन हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षीही वरुणराजाची कृपादृष्टी कायम राहणार आहे. हा अंदाज खरा ठरला तर नक्कीच याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.