यवत – खुटबाव ता.दौंड येथे दि.२४ रोजी माझ्या भावाला तू मारहाण का केलीस ? असा जाब विचारणाऱ्यास कुदळीने आणि चाकूने मारहाण करून, जातीवाचक शिवीगाळ,करण्यात आल्याची गंभीर घटना खुटबाव येथे घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक सविस्तर माहिती अशी की, दि. २४ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आकाश सोपान फाजगे रा. खुटबाव, ता.दौंड यानी आरोपी रोहन नाना जाधव रा. खुटबाव,ता.दौंड माझा भाऊ भानदास सोपान फाजगे रा. खुटबाव ता. दौंड याला मारहाण का केली अशी विचारणा केली असता आरोपी रोहन जाधव याने फिर्यादी आकाश फाजगे व त्याचा भाऊ भानदास फाजगे यां दोघांना तुम्ही खालच्या जातीचा आहेत, तुम्ही हिशोबात राह, नाही तर तुझा कार्यक्रमाच करतो,अशी जातीवाचक शिवीगाळ,दमदाटी, करून आरोपी जाधव याने त्याच्या खिशातून चाकू काढून माझ्या डोक्यावर मारहाण करून आपखुशीने दुखापत केली. त्यावेळी त्याचा भाऊ भानुदास सोपान फाजगे हा मला सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्यालाही लाकडी दांडा असणाऱ्या कुदळीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डाव्या बरगडीवर मारून गंभीर दुखापत करण्यात आली. या सर्व घेटनेनंतर फिर्यादी आकाश फाजगे याने रोहन जाधव याचेविरुद्ध कायदेशीर तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस करीत आहेत तर सदर गुन्हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दाखल केला आहे.