आयात केलेल्या फ्रोझन चिकनमध्ये कोरोना विषाणू आढळल्याने चीनमध्ये खळबळ

शेंन्झेन (चीन) – ब्राझील येथून आयात केलेल्या फ्रोझन चिकनचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चीनने नागरिकांना असे पदार्थ खाताना सावधानी बाळगण्याची सूचना केली आहे. ही घटना चीनच्या शेंन्झेन प्रांतात घडली आहे.

चीनमध्ये जून महिन्यापासूनच आयात करण्यात आलेल्या मांस व सी फूडची चाचणी करण्यात येत असून यापूर्वी अशा पदार्थांच्या पॅकेजेसवर कोरोना विषाणू असल्याचे आढळून आले होते. मात्र प्रत्यक्ष मांसाच्या वरच्या भागावर कोरोना विषाणू सापडल्याचे हे पहिलंच प्रकरण ठरलंय. फ्रोझन चिकन कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने शेंन्झेन प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.

फ्रोझन चिकनच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून संपर्कातील एकही व्यक्तीला कोरोना झाला नसल्याचं आढळून आलंय. वैज्ञानिकांनी देखील कोरोना विषाणूमध्ये अन्न व अन्नाची आवरणे यांवर तग धरण्याची क्षमता असल्याचं म्हंटल आहे. मात्र सामान्य तापमानामध्ये तो फार काळ टिकू शकत नसल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.