मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले मात्र यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, कराडकर यांना ताब्यात घेतल्यामुळं त्यांचे समर्थक आक्रमक झाले असून त्यामुळं तणाव निर्माण झाला आहे.
तत्पूर्वी, पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना बंडातात्या कराडकर यांनी सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारु पित असल्याचाही दावा केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंबाबत काही आक्षेपार्ह उल्लेख केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, राजकीय वातावरण तापल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली.
दरम्यान, साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचे म्हटले होते.
संबंधित बातम्या
मंत्र्या-संत्र्यांची पोरं सर्रास दारू पितात
जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर केली सडकून टीका