नवी दिल्ली – नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (National Eligibility cum Entrance Test, NEET PG 2022 Postponement) संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा 2022 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 12 मार्च 2022 रोजी होणारी ही परिक्षा सहा ते आठ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. एका याचिकेत राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) PG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.
ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची मागणी होती. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की NEET PG काऊन्सेलिंग 2021 च्या तारखा (NEET PG Counselling 2021 dates) थेट पुढील परीक्षेच्या तारखांसोबत क्लॅश होत आहेत. ही परीक्षा देऊ इच्छिणारे उमेदवार त्यामुळे चिंतेत होते. त्यामुळे अशा परिस्थितीत आगामी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्याला आता यश आले आहे.
विद्यार्थ्यांनी ही मागणी सोशल मीडियावर मांडली आणि आरोग्य मंत्रालयाकडे या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती सातत्याने केली. यासाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती, त्यावर कोर्टानेही विचार करण्यास मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त मानून आरोग्य मंत्रालयाने आता परीक्षा 6 ते 8 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. मंत्रालयाने मान्य केले आहे की परीक्षेच्या तारखा मागील सत्राच्या समुपदेशन तारखांशी क्लॅश होत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे सांगण्यात आले आहे.