चेन्नाई – ज्येष्ठ द्रमुक नेते के अनबझगन यांचे आज वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. पक्षाचे संस्थापक दिवंगत के करूणानिधी यांचे ते विश्वासु सहकारी मानले जात होते. त्यांनी 43 वर्षे द्रमुक पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे.
तामिळनाडु विधानसभेवर ते तब्बल नऊ वेळा निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे द्रमुक पक्षाने सात दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला असून पक्षाच्या मुख्यालयातील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
अनबझगन यांनी द्रमुकच्या मंत्रिमंडळात अर्थ व सार्वजनिक कल्याण ही खाती सांभाळली होती. त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू, तामिळनाडुचे मुख्यमंत्री के पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम, अभिनेते रजनीकांत, कमल हसन, कॉंग्रेस नेते पी चिदंबरम, इत्यादींनी शोक व्यक्त केला आहे.