ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांचा मोदींसोबत सेल्फी, म्हणाले…

ओसाका : जपान मधील ओसाका शहरात जी-20 शिखर संमेलनासाठी जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली असून, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या संमेलनासाठी गेले आहेत.

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचीत पंतप्रधान ‘स्कॉट मॉरिसन’ यांची भेट घेतली. या भेटीनंतर मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींचं खास शब्दांत कौतुक केलं आणि मोदींसोबत एक सेल्फी घेत ट्विटर शेअर केला. स्कॉट मॉरिसन यांनी या सेल्फीला “कितने अच्छे है मोदी” असं कॅप्शनही दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.