…आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान फॅन्सची मैदानाबाहेरचं ‘फ्री स्टाईल’ हाणामारी

लीड्स – विश्वचषक स्पर्धेमध्ये आज पाकिस्तान व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान सामना रंगला असून प्रथम नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २२८ धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमधील सामन्याला प्रेक्षकांनी केलेल्या हाणामारीमुळे गालबोट लागले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, अफगाणिस्तान व पाकिस्तान हा सामना सुरु असताना हेडिंग्ले क्रिकेट मैदानाच्या परिसरात ‘जस्टीस फॉर बलुचिस्तान’ असा संदेश लिहलेलं एक विमान उडवण्यात आलं होतं.

यावरून चिडलेल्या पाकिस्तान फॅन्सने अफगाणिस्तानच्या फॅन्सना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला चढवला. अफगाणिस्तानच्या फॅन्सने देखील पाकिस्तानी फॅन्ससोबत फ्री स्टाईल हाणामारी करत जशास तसे उत्तर दिले. फॅन्सने केलेल्या या तुफान  हाणामारीमुळे हेडिंग्ले क्रिकेट मैदान परिसरात तणावाचं वातावरण निर्मण झालं होता. याबाबत आता लीड्स हवाई परिवहन विभागातर्फे अधिक चौकशी करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.