मुंबई – अनेकदा साऊथ स्टार आपल्या अभिनयासोबत त्यांच्या दिलदार स्वभावासाठी देखील ओळखले जातात. अभिनेता रामचरण हे त्यातीलच एक नाव. मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा असूनही रामचरण नेहमी साधा आणि ग्राउंड टूअर्थ असल्याचे पाहायला मिळते. रामचरणच्या याच साधेपणाचा अनुभव नुकताच एका शोदरम्यान पाहायला मिळाला. यावेळी रामचरणने दिवंगत कर्नल संतोष बाबू यांच्या मुलासोबत फोटो काढून सर्वांची मन जिंकली.
आर आर आर हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला.रामचरणने त्यात साकारलेली भूमिका देखील सर्वांना खूप आवडली. नुकतच रामचरणला एका पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळेस त्याने २०२० मध्ये गलवान व्हॅलीत वीरमरण आलेले दिवंगत कर्नल संतोष बाबू यांच्या मुलांबरोबर सेल्फी काढला. रामचरणची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
. @AlwaysRamCharan 🤳#RamCharan #TrueLegend pic.twitter.com/GzlNidMkuA
— Ram (@HereFoRamCharan) December 3, 2022
फक्त साऊथ प्रेक्षकांनीच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. रामचरणच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी खूपच कौतुक केलय. अनेकांनी त्याला लेजेंड म्हटलंय तर काहींनी त्यावर मेगा मेगा स्टार अशा कमेंट केल्या आहेत. रामचरण शंकर दिग्दर्शित अंटायटल्ड सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या व्यस्त आहे. ज्यात किआरा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.