मुंबई – हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता ‘रितेश देशमुख’ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. रितेश सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो.
दरम्यान, पुन्हा एकदा रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये महिला एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यासाठी मदत करताना दिसत आहे.
We should all aim to be like her when no one is watching. #Salute pic.twitter.com/8j1Ui3mwDZ
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 9, 2020
हा व्हिडीओ शेअर करत रितेशने “कोणीही पाहत नसताना देखील या महिलाने त्या दिव्यांग व्यक्तीला मदत केली आहे. आपण सुद्धा या महिलेसारखे बनायला हवे” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या रितेशने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी त्याच्यावर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.